Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळाशैक्षणिक

दहावीच्या परिक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचा चि.चैतन्य तरकसे करमाळा तालुक्यात प्रथम

करमाळा प्रतिनिधी दहावी परिक्षेत दहावीच्या निकालात चैतन्य मंगेश तरकसे हा ४९० ( ९८.०० टक्के) गुण मिळवून महात्मा विद्यालयात प्रथम आला आहे. गौरी नारायण डौले ४८९(९७.८०) द्वितीय तर कौस्तुभ लहू चव्हाण ४८० (९६ टक्के) गुण मिळवून तिसरा आला आहे.तेजस विलास मारकड ४७९ (९५.८०) व कु.सृष्टी दत्तात्रय वीर हि ४७६ (९५.२०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असुन मधुश्री लहु चेंडगे हिने ४७६ गुण मिळवुन पाचवा   क्रंमांक मिळवला आहे.
प्रशालेचा एकुण निकाल ९२.३० टक्के एवढा लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप,युवा नेते शंभूराजे जगताप तसेच प्राचार्य श्री कापले सर उपमुख्याध्यापक श्री बागवान सर पर्यवेक्षक श्री एस टी शिंदे सर व श्री बीके पाटील सर विज्ञान विभाग प्रमुख श्री पवार सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!