श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुरातन दगडी स्वरूपातील मूळ मंदिराचे जतन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. श्रीजगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या पुढाकारातून गेल्या वर्षापासून सुरू असलेले हे काम भाविकांच्या देणगीतून साकारले जात आहे.
रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी कै. सुनंदा व शामराव म्हैत्रस यांच्या स्मरणार्थ श्री. विकास राजेंद्र चौकटे (रा. बारामती) यांनी मंदिर संवर्धनासाठी ₹३,००१ इतकी रोख देणगी अर्पण केली. त्यांच्या या योगदानाबद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या ऐतिहासिक व पुरातन वैभवाचे जतन करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमात अधिकाधिक भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. तसेच देणगीदारांच्या सोयीसाठी ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी व्यवस्थापक अशोक गाठे (मो. ९४०४७०८९२४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


