Sunday, October 11, 2026
Latest:
Uncategorized

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी
करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत महोत्सव २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवात विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त ‘बिजमाता’ सौ. राहिबाई सोमा पोपेरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मार्गदर्शक  विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. संस्थात्मक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राचार्य फंड यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होते आणि नव्या पिढीला सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत असून, प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या महोत्सवातून त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना उजाळा देण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजातील विधायक कार्याला चालना देण्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. वसंतराव दिवेकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी  यशकल्याणी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश करे पाटील, श्री. भारतभाऊ शिंदे साहेब, डॉ. सौ. प्रचिती पुंडे मॅडम आणि सुलतान संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
वसंतराव दिवेकर यांच्या स्मृतींना अभिवादन करताना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणारा हा वसंत महोत्सव उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. प्राचार्य मिलिंद फंड यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारामुळे विद्या विकास मंडळाच्या कार्यालाही गौरव प्राप्त झाला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!