Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाशैक्षणिक

ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा 2022 ची फायनल परीक्षा उत्साहात संप्पन एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी टॅलेंट परीक्षा घेणारे हे एकमेव इन्स्टिट्यूट

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील ग्लोबल इन्स्टिस्टयुटच्यावतीने ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा 2022 ची फायनल परीक्षा उत्साहात पार पडली
आजच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या विद्यालयातून त्यामध्ये वीट, कोर्टी ,सावडी , कुंभारगाव, जिंती , टाकळी,कुंभेज, उमरड, वाशिंबे , केतुर 2 , राजुरी , चिकलठाण ,श्री अकॅडमी जेऊर , शेलगाव कारखाना , केम मधील 4 म्हणजे उत्तरेश्वर विद्यालय, तळेकर विद्यालय , नूतन विद्यालय , शारदा बाई पवार विद्यालय , घोटी , साडे, संगोबा , जातेगाव, मांगी, पोथरे, आण्णासाहेब हायस्कूल करमाळा , गिरिदार दास देवी विद्यालय करमाळा , कन्या विद्यालय करमाळा, असे जवळ जवळ 28 – 30 विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. प्रथम पूर्व परीक्षा या सर्व विद्यालयतून कमीत कमी 640 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांनी सर्वांनी आज ग्लोबल इन्स्टिट्यूट मध्ये येऊन फायनल परीक्षा दिली असून त्यांचा निकाल पुढील रविवारी म्हणजे 1 जानेवारी ला जाहीर होईल. या निमित्ताने सर्व विद्यार्थी व पालकांना मधून खूप आनंद व्यक्त होत होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी टॅलेंट परीक्षा घेणारे हे एकमेव इन्स्टिट्यूट आहे .या वेळी येणाऱ्या सर्व पालकांना संस्थापक निकत सर यांनी पुढील करियर बद्दल मार्गदर्शन केलेे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group