Saturday, November 28, 2026
Latest:
Uncategorized

करमाळा नगरपरिषद थकीत मालमत्ता करावरील दंडात ५० टक्के सवलत – नगराध्यक्षा मोहिनी सावंत

करमाळा प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील दंडामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यासाठी करमाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्षा मोहिनी सावंत म्हणाल्या की, थकीत असलेल्या मालमत्ता करावरील आकारण्यात आलेल्या दंडापैकी ५० टक्क्यांपर्यंत दंड माफ करण्याचा ठराव घेण्यात आला होता त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सदरच्या ठरावानुसार वरील प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. यासाठी उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवक यांनी विशेष सहकार्य केले होते.
पुढे बोलताना सावंत म्हणाल्या की, करमाळा वासीयांना या अभय योजनेची अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होती. या योजनेमुळे नगर परिषदेचा मूळ कर भरणा तर होईलच परंतु दुष्काळी परिस्थिती मध्ये नागरिकाना या योजनेचा लाभ देऊन आर्थिक दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता त्याला यश मिळाले आहे.
सदरील थकीत कर भरून अभय योजनेचा लाभ घेण्याचे आणि नगरपरिषदेच्या कर वसुलीस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून या अभय योजनेमुळे नगरिकानी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवकांचे आभार मानत असून करदात्याना हा मोठा दिलासा असल्याने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचे या अभय योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!