गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन
करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद गावपातळीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ हा संकल्प घेऊन प्रत्यक्ष गावागावात शाखा उभारणीच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानाचा शुभारंभ पांडे येथे दोन भाजपा शाखा व धायखिंडी येथे एका भाजपा शाखेचे उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी गावातील भाजपा पदाधिकारी, शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यामध्ये ‘गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.
शाखा उद्घाटनाच्या वेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद ही बूथ आणि गावपातळीवरील कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पक्षाची सक्रिय शाखा असणे, प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांचे संघटन उभे राहणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
पांडे येथे दोन शाखा आणि धायखिंडी येथे एका शाखेचे उद्घाटन करून गावपातळीवर पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. या शाखांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांशी सातत्याने संपर्क ठेवणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार गावागावात पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने काम करतील, असेही चिवटे यांनी सांगितले.
गावातील शाखा ही केवळ पक्षाचे कार्यालय किंवा संघटनात्मक केंद्र न राहता जनतेशी सातत्याने संवाद साधणारे आणि त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम म्हणून कार्य करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गणेश चिवटे यांनी जिल्ह्यातील विविध मंडळे, शक्ती केंद्रे आणि बूथ पातळीवरील संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून गावागावात शाखा उभारणीच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक बूथपर्यंत संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या शाखा उद्घाटन कार्यक्रमास शाखा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शाखांच्या माध्यमातून गावपातळीवर संघटनात्मक कामाला गती देत पक्षाची ध्येयधोरणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी मंडलाध्यक्ष काकासाहेब सरडे, भाजपा नेते प्रतापराव जगताप, नगरसेवक रामभाऊ ढाणे , महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अफसर जाधव, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, अमोल पवार , बंडू शिंदे, सोमनाथ घाडगे , हनुमंत रणदिवे, हर्षल शिंगाडे, नितीन निकम, नाना अनारसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,


