केम येथे मा.पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपच्यावतीने जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी केम येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या 97 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली .या प्रसंगी केम ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तसेच भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी केम येथील ज्येष्ठ नागरिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम यांच्या नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय सोलापुरे, दयानंद तळेकर उपाध्यक्ष सचिन रनशिंगारे सौ उज्वला तळेकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन केम शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री गणेश (आबा) तळेकर यांनी केले होते. यानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सोलापूर मा. अनिरुद्ध कांबळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सागर दोंड ए.पी. ग्रुप अध्यक्ष अच्युत (काका) पाटील प्रहार संघटना करमाळा अध्यक्ष संदीप तळेकर क्रीडाशिक्षक अमोल तळेकर (सर) धनंजय ताकमोगे विकास कळसाईत दत्ताभाऊ तळेकर सागर नागटिळक ज्ञानेश्वर गोडसे पराग कुलकर्णी राहुल रामदासी शंकर तळेकर गणेश गुरव ज्ञानेश्वर तळेकर,विलास तळेकर हे सर्वजण उपस्थित होते
