वाशिंबे ता. करमाळा चे सुपुत्र श्री मनोज महादेव बोबडे सौ.सोनाली मनोज बोबडे शेतकरी पुत्र फाउंडेशन, महाराष्ट्र या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित
वाशिंबे (ता. करमाळा) चे सुपुत्र *श्री मनोज महादेव बोबडे,(सामाजीक) सौ.सोनाली मनोज बोबडे*( सामाजीक)श्री. अभिजीत राजाभाऊ पाटील ( युवा शेतकरी ) यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अहमदनगर येथील शेतकरी पुत्र फाउंडेशन, महाराष्ट्र या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतकरी पुत्र फाउंडेशनकडून यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा मंगळवार दि. ८ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील रेडियन्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यामध्ये कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड २०२२ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बोबडे परीवार हे गेल्या अनेक वर्षभरापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य हे समाजाला नेहमी प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे.
सौ.सोनाली बोबडे यांनी…प्रदूषण नियंत्रणात यावे महिलांमध्ये जनजागृती व्हवी महिलांना मकर संक्रांतीनिमित्त मागील आठ वर्षापासून वृक्षभेट देतात.
नदीपात्रात अस्थि विसर्जन करू नका नदीचे पाण्याची प्रदूषणषण करू नका असे आव्हान करून त्या कुटुंबाला ती अस्ती विसर्जन न करता राखेत तुम्ही झाडे लावा.
आम्ही झाडे मोफत देऊ अशी जनजागृती करतात. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शेतकरी पुत्र फाउंडेशन आयोजित नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड २०२२ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पद्यश्री मा. सौ राहीबाई पोपरे (बीजमाता), पद्मश्री पुरस्कार विजेते मा. पोपटराव पवार (आदर्श सरपंच) हिवरे बाजार, मा. श्री कैलास राऊत, मा. श्री किशोर भणगे अध्यक्ष युवा काँग्रेस नेवासा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत अशोक शेळके, उपाध्यक्ष कृष्णा पाठक, सचिव रोहन ढेरे, सहसचिव सौरभ निकम, सल्लागार ऋषिकेश पाठक, खजिनदार शुभम सुद्रिक, वाशिंब्यचे श्री.मनोज बोबडे सौ.सोनाली बोबडे लक्ष्मी , तसेच पुरस्कारार्थी शेतकरी बांधव व मान्यवर उपस्थित होते.
