Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

करमाळा तालुक्यातील  भिलारवाडी येथे’ऑक्सीजन हबचा’ लोकार्पण सोहळा

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे आशिर्वाद वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘ऑक्सीजन हबचा’ स्मृतीवन वसुंधरा लोकार्पण सोहळा गुरूवारी सहा ऑक्टोबर रोजी मकाई सहकारी साखर कारखान्यासमोर संपन्न होत आहे.झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्व लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी एक प्रयत्न म्हणून आशिर्वाद वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथील ‘दि.स्काय किचन’यांच्या सहयोगातून सत्तर वेगवेगळ्या झाडांचे मियावाकी तंत्रज्ञानाने घनदाट रोपन करून जैवविविधता जपत एक मिनी जंगल उभारण्यात आले आहे या स्मृतीवनाचा वसुंधरा लोकार्पण सोहळा सहा ऑक्टोबर रोजी ह.भ.प.सुदाम गोरखे महाराज दि स्काय किचनच्या वृषाली गोसावी यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला तहसील समीर माने,सुशिल बेल्हेकर तुषार गोसावी केतन गोसावी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे,मकाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, सरपंच भारत गिरंजे,रामभाऊ येडे, जगन्नाथ देशपांडे, संतोष भाईक, गोविंद खुरंगे,मुकूंद शिंगाडे ,गजेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन आशिर्वाद वृक्ष फाऊंडेशनचे सुनील चौरे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group