Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसाहित्य

करमाळयाची कर्मभुमी असलेले जेष्ठ साहित्यिक डाॅ.राजेंद्र दाससरांना ग्रामसुधार समितिचा करमाळा भुषण पुरस्कार जाहिर

करमाळा प्रतिनिधी
करमाळा येेेथील ग्रामसुधार समितीच्यावतीने दिला जाणारा सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. यशकल्याणी सेवाभवन परिसर येथे होणार आहे.या पुरस्काराचे वितरण सिनेअभिनेते व दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे यांचे हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी तसेच साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे; असे आवाहन ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबूराव हिरडे, उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे व सचिव डी. जी. पाखरे यांनी केले.प्रा. डॉ. राजेंद्र दास यांचा करमाळ्याशी लहानपणापासून संपर्क आहे. त्यांचे वडील करमाळा तालुक्यात शिक्षक होते. त्यांचे स्वत:चे शिक्षणही करमाळ्यात झाले आहे. ते लेखक, कवी, व्याख्याते म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचा ‘इमान’, ‘कोसळेपर्यंत’ व ‘शब्द भेटण्याच्या वयात’ हे कवितासंग्रह प्रकाशित असून ‘यांत्रिक’ हा चरित्रग्रंथ प्रकाशित आहेत. या पुस्तकांना सात पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group