Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

सावंत परिवारातील साक्षी सचिन सावंत हिचे दुखःद‌ निधन

करमाळा प्रतिनिधी सावंत परिवारातील सचिन सावंत यांची कन्या साक्षी सचिन सावंत (वय-१४) हिचे आज (ता.७) ह्रदयविकाराने निधन झाले आहे. साक्षी ही इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होती .साक्षी चा जन्म 2007 मध्ये झाला होता. लहानपणापासून तिला फुप्फुसाचा त्रास होता. परंतु तो लक्षात आलेला नव्हता. कालांतराने अधिक त्रास वाढला व तिला वयाच्या पाचव्या वर्षी दवाखान्यात नेल्यानंतर तिला फुफुसाचा त्रास असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर सावंत परिवारासह संपूर्ण पाहुणे व मित्र-मैत्रिणी तिचे लाड पुरवले व आजपर्यंत ती सर्वांच्या गळ्यातील ताईत म्हणून गल्लीत वावरत होती. पण आज अचानक ती सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.साक्षीही येथील कर्मवीर अण्णासाहेब विद्यालयात शिक्षण घेत होती. करमाळा जामखेड रस्त्यावर असलेल्या सावंत फार्म हाऊस या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले साक्षी ही विठ्ठल आप्पा सावंत यांची नात तर सावंत गटाचे नेते सुनिल सावंत व नगरसेवक संजय सावंत, पंचायत समीती सदस्य ॲड. राहुल सावंत यांची पुतणी होत.साक्षीच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group