ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळामध्ये रक्षाबंधन उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळ्यातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी इन्स्टिट्यूट मध्ये योग्य ती सजावट करून सर्व मुलींनी सर्व मुलांना राख्या बांधून आम्ही सर्व भाव बहिणीचे अतूट नाते जपण्यात नेहमी पुढाकार घेऊ असं सांगण्यात आले.यावेळी सर्व पुरुष शिक्षकांना महिला शिक्षकांनी राख्या बांधल्या.पर्यावरणाचा विचार करता सर्वांनी उगाच काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा प्रत्येकाला एक एक झाड गिफ्ट म्हणून देण्याचा विचार मुलांनी स्वतः घेतल्याने त्याचे कौतुक सर्वांकडून केले जात आहे.यावेळी इन्स्टिट्यूट संस्थापक प्रा निकत सर , संचालिका अश्विनी निकत मॅडम ,बोरुडे सर, दहिटनकर सर, पोळके मॅडम,कांबळे मॅडम उपस्थित होते
