आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2025-30 साठी झोळ गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज दाखल
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक 2025-30 साठी गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी झोळ गटाच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी पोमलवाडी गटातून प्रा. रामदास मधुकर झोळ,अनुसूचित जाती मतदारसंघातून दशरथ (अण्णा )भीमराव कांबळे, जेऊर गटातून रवींद्र सदाशिव गोडगे, रावगाव गटातून कल्याण सिताराम पाटील, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून रायचंद कृष्णा खाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उर्वरित उमेदवारी अर्ज सोमवारी भरले जाणार आहेत. शेतकरी सभासद कामगार यांच्या हितासाठी शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले.
