करमाळा शहरांमध्ये शुक्रवारी अहिल्यादेवी जयंती उत्सवाच्या निमित्ताने अहिल्यादेवी प्रतिमेची भव्य मिरवणूक आमदार संजय मामा शिंदे अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले यांची उपस्थिती
करमाळा प्रतिनिधी
अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) दुपारी ४ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, मनोहरमामा भोसले, बापू बिरू वाटेगावकर यांचे नातू अण्णा महाराज वाटेगावकर व धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम हाके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होईल आणि त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ होणार आहे
बायपास चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा- सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे येऊन गायकवाड चौकात ही मिरवणुक समाप्त होणार आहे.दोस्ती डीजे, दोस्ती बँजो, केम येथील सैराट हलगी ग्रुप, शेटफळ येथील नागनाथ लेझीम पथक, जिंती येथील लहू क्रांती हलगी ग्रुप, शाही घोडे, ढोल व ताशा असे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
यामध्ये जास्तीत जास्त बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.
