भोपळा दाखवून आंदोलन म्हणजे काही जनांच्या राजकीय अस्तित्वाची शेवटची फडफड. अमोल पवार. अध्यक्ष भाजप युवा मोर्चा
करमाळा प्रतिनिधी
आक्टोबर महीन्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणुक ही शेवटची निवडणुक ठरु शकते त्यानंतर च्या काळात स्वताचे अस्तित्व ही राहू शकणार नाही हे काही लोकांना माहीत आहे.त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पा बाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यासाठी भोपळा दाखवून आंदोलनाचे निमित्त करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयोग काही जणांकडून करण्यात आला आहे.ज्यांनी भोपळा दाखवून आंदोलन केले ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची शेवटची फडफड सुरू असल्याचे मत भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
पवार यांनी अधिक बोलताना सांगितले कीआजचा अर्थसंकल्प मोदींचा संकल्प आहे. विकासाकडे वेगाने पाऊल टाकणारा आहे. विकासाभिमुख हा अर्थसंकल्प आहे. सहकार खातं, नागरी उड्डाण, महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात चांगली तरतूद करण्यात आली आहे. 100 शहरात इंडस्ट्रियल पार्क केले जाणार आहेत. सर्वसामान्य माणसाचा विकास होईल असा अर्थसंकल्प आहे. सहकार आणि कृषी क्षेत्रासाठी दीड लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशात 20-25 विमानतळ येत्या काळात होतील. सर्वसामान्य माणसाचा विकास झाल्याचं दिसत आहे,करमाळा तालुक्यातील रीटेवाडी उपसा सिंचन योजना,एमआयडीसी असे महत्त्वाचे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले.परंतु ज्यांना अर्थ संकल्पातले काही एक अक्षर ही कळत नाही अंशांनी अर्थ संकल्पावर बोलणे म्हणजे सुतावरुण स्वर्ग गाठण्यासारखे आहे.