करमाळा भाजपा युवा मोर्चा कडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार वृद्धांना अन्नदान
करमाळा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान, विकासाभिमुख उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा करमाळा तालुक्याच्या वतीने करमाळा शहरातील गणेश भाऊ चिवटे यांच्या माध्यमातून चालू असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेतील निराधार गरजू वृद्ध नागरिकांना युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले, यावेळी कमलाई नगरीचे मुख्य संपादक पत्रकार जयंत दळवी यांच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेची पुजा करून डबे वाटप करण्यात आले,
यामध्ये पवार यांनी करमाळा शहरातील 60 ते 70 वयोवृद्ध निराधार ज्यांना कोणीही सांभाळत नाहीत व ज्यांना कोणीही वारस नाही अशा नागरिकांसाठी दोन वेळचे मोफत जेवण देऊन त्यांच्या एक दिवसाच्या उदरनिर्वाहाचे कार्य केले आहे व देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला या वृद्धांना अन्नदान करण्याचा संकल्पही केला आहे,यावेळी श्रीराम प्रतिष्ठानच्या टिमने त्यांचे आभार मानले.
