पांडे येथील जगदंबा देवीच्या यात्रेस आज पासून प्रारंभ
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पांडे येथील ग्रामदैवत आई जगदंबा देवी यांच्या यात्रेस आज पासून प्रारंभ होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
आई जगदंबा देवी यांच्या यात्रेस आज सायंकाळ पाच वाजल्यापासून प्रारंभ होणार असून सदर यात्रेसाठी करमाळा तालुका सहित पर जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मुंबई उस्मानाबाद पंचक्रोशीतील भाविक सदरच्या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवितात
या यात्रेमध्ये सायंकाळी पाच वाजता पांडे बस स्थानकापासून गाड्या उडण्याचा कार्यक्रम असतो सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी असते याशिवाय रात्री बारा वाजता आई जगदंबा देवीचा छबिना सवाद्य मिरवणुकीसह निघत असतो.पांडे येथील ग्रामदैवत आई जगदंबा देवी यांचा उत्सव मोठ्या शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी पांडे येथील ग्रामस्थ तसेच यात्रा उत्सव कमिटी परिश्रम घेत असल्याची माहिती पांडे येथील ग्रामस्थ पत्रकार संजय तेली यांनी दिली
