प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनच्या वतीने कोजागिरी पोर्णिमे निमित्त १०० नागरीकांना मोफत तुळजाभवानी दर्शन यात्रा
करमाळा प्रतिनिधी.
प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन यांच्या वतीने कोजागिरी पोर्णिमे निमित्त वाशिंबे परिसरातील सर्व देवी भक्तांसाठी माता तुळजाभवानी दर्शन यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये भाविकांसाठी वाशिंबे ते तुळजापूर असे बसचे नियोजन करून १००भाविकांसह २ बसचे वाशिंबे येथून आज सकाळी ८वा.प्रस्थान झाले.यामध्ये भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यापुर्वी ही रामदास झोळ फाऊंडेशन यांच्या वतीने भैरवनाथ मंदीर परिसर,वाशिंबे स्मशानभुमि येथे वृक्षारोपण करुन संगोपन करण्यात आले आहे.गावातील नागरीकांना बसण्यासाठी २५ बेंच देण्यात आल्या.ईश्रमकार्डचे २०० नागरीकांना मोफत वाटप करण्यात आले.वाशिंबे गावासाठी ग्रामपंचायत वाशिंबे आपले सहर्ष स्वागत करत आहे या नावाने भव्य प्रवेशद्वार स्वखर्चातून बांधण्यात येणार आहे.यासह भविष्य काळात ही असेच स्तुत्य ऊपक्रम राबविण्यात येणार आहेत असे प्रा. झोळ यांनी सांगितले
