महायुतीचे सरकार आदिनाथला नव संजीवनी देऊ शकते आदिनाथ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र यावे-महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नव संजीवनी देऊन करमाळ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक महायुती सरकार मध्येच असून यासाठी महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व तालुक्यातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी
अशी भूमिका आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मांडली आहे.बचाव समितीच्या माध्यमातून बंद पडलेला आदिनाथ सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमोल मदत केली होती
त्यावेळेस जवळपास एक लाख टन उसाचे गाळप झाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनी नुकतेच सात कारखान्यांना अकराशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन देऊन कारखाने वाचविले आहे.मी प्रशासक असताना आदिनाथ कारखान्याचा 189 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असूनतत्कालीन साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी याला शिफारस दिलेली आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाला तर आजिनाथ कारखाना विस्तारीकरण होऊन प्रतिदिन दहा हजार मॅट्रिक तर प्रति दिवस गाळप करू शकतो
प्रशासकीय काळात आदिनाथ कारखान्याच्या नवीन दोन आठ इंची पाईपलाईन पूर्ण झाली असून आदिनाथ ची उर्वरित शेतजमीन एका नामांकित केळी रोपे उत्पादन संवर्धन कंपनीने भाड्याने मागितलेली आहे.प्रशासकीय काळात रस्त्याच्या कडेने जवळपास 300 व्यावसायिक गाळे काढण्याची प्रयोजन केले होते.
700 ते 800 कोटी रुपये कर्ज असलेले पंढरपूरचे साखर कारखाने सक्षमपणे चालू आहेत आदिनाथ कारखान्याची सर्व प्रॉपर्टी कर्जापेक्षा जास्त आहे.यामुळे महायुतीच्या विचाराचे पदाधिकारी जर एकत्र येऊन कारखाना निवडणूक लढवली तर आदिनाथ वाचू शकतो यासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे युवा नेते दिग्विजय बागल यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मांडली आहे.
@@@@@
मध्यस्ता ची भूमिका विलासराव घुमरे यांनी पार पाडावीमाजी आमदार संजय मामा शिंदे घुमरे यांची व्याही असून
दिग्विजय बागल यांच काका आहेत.दोन्ही तिन्ही गटात त्यांचे चांगले संबंध असून आदिनाथच्या हितासाठी त्यांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडावी.अशी मागणी महेश ही चिवटे त्यांनी केली आहे
@@@@
आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांची वरदायिनी असून हा कारखाना वाचवण्यासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पुढाकार घ्यावा.संजय मामांनी समविचारी कार्यकर्ते व पक्षाच्या बरोबर युतीचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य राहील सुजित तात्या बागल!!!
मुख्य प्रवक्ते माजी आमदार संजय मामा शिंदे गट
@@@
