करमाळा

आमदार नारायण आबा पाटील यांचा आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उत्सुकता लागून राहिलेला आमदार नारायण आबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज देखील आज दाखल झाला. याबाबत अधिक माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की आमदार नारायण आबा पाटील यांनी केम ऊस उत्पादक गटातुन तसेच एनटी मधून‌ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीच आमदार नारायण आबा पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. आज आमदार पाटील यांचा उमेदवारी अर्ज सुचकांच्या वतीने निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला. यावेळी राजन (अण्णा) पाटील, युवानेते सुनिल बापु सावंत, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, माजी जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, कर्मयोगी पतसंस्था चेअरमन संजयकुमार गादिया,पाटील‌ गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक, वाय सी एम काॅलेजचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले , माजी सरपंच डाॅ अमोल घाडगे,
अमरजीत साळुंखे, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे, राहुल गोडगे, माजी सभापती शेखर गाडे, माजी संचालक रविबुवा कोकरे, रविकिरण फुके, आबासाहेब अंबारे, रामभाऊ जगताप, माजी संचालक डॉ केवारे, श्रीमंत चौधरी, स्वीय सहायक सुर्यकांत पाटील आदि उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group