Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाकृषी

करमाळा शहरात उद्या राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व ॲग्रो मॉलचे उद्घघाटन …

करमाळा प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या 10 हजार A P.O अंतर्गत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची उद्या दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून याच दिवशी कंपनीच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या ॲग्री मॉल चे उद्घाटन व सभासदांना शेअर सर्टिफिकेट चे वाटप करमाळा येथील आयसीआयसी बँकेच्या शेजारी ॲग्रो मॉल च्या ठिकाणी होईल तरी सर्व सभासदांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 25 मे 2022 रोजी राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची स्थापना केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे केली असून या कंपनीचे 383 सभासद आहेत .कंपनीचे कार्यालय जानेवारी 2023 मध्ये वरकटणे येथे सुरू केलेले आहे. कंपनीने शेतकऱ्यांची केळी खरेदी विक्री सुरू केलेली असून प्रायोगिक तत्त्वावर ती 1 कंटेनर दुबई येथे एक्सपोर्ट केलेला आहे .त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी करमाळा येथे ॲग्रो मॉल सुरू केलेला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बी -बियाणे व कीटकनाशके माफक दरामध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत. जैन या नामांकित कंपनीचे डीलरशिप घेतलेली असून त्यांचे पीव्हीसी पाईप ,ठिबक, आंबा, डाळिंब व केळीची टिशू कल्चर रोपे सभासदांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
केंद्र शासनाच्या 10 हजार A P.O अंतर्गत गतवर्षीपासून ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी चे कामकाज अतिशय उत्तम पद्धतीने सुरू असल्यामुळे यावर्षीच्या 15 ऑगस्ट 2023 च्या ध्वजारोहण समारंभासाठी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्र सरकारकडून दिले गेले होते ही कंपनीच्या कामाची पोहोच पावती आहे .इथून पुढेही सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून सभासदांसाठी पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज उभारणी, क्लिनिंग, ग्रीडींग व पॅकेजिंग हाऊस उभारणे, सभासदांना माफक दरामध्ये माती परीक्षण करून देणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणारे सर्व अवजारे ,फवारणी पंप इत्यादी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमासाठी नाबार्डचे सीजीएम अनंतकुमार रावत, सोलापूरचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री दत्तात्रय गावसाने, डीडीएम नितीन शेळके तसेच वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे श्रीकांतीलाल गीते ,समीना पठाण, तहसीलदार विजयकुमार जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे ,सह्याद्री ऍग्रो नाशिकचे सचीन वाळुंज आदी उपस्थित राहणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group