कृर्षी बाजार समिती निवडणुकीत सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलेला मताचा अधिकार आनंदाची बाब… प्रा शिवाजीराव बंडगर
करमाळा प्रतिनिधी कृर्षी बाजार समितीच्या निवडणूकीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला ही आनंदाची बाब असुन या निर्णयाचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांनी स्वागत केले आहे.
भाजप- शिवसेना युती सरकारने यापूर्वीही हा निर्णय घेतलेला होता. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यात बदल केला होता. सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीच्या निवडणुका याच पद्धतीने झालेल्या होत्या
महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार बाजार समितीचे संचालक सहकारी संस्थांचे संचालक, प्राथमिक सहकारी संस्था व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मतदानावर बाजार समितीचे निवडणूक होत. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार सामान्य शेतकऱ्यास या निवडणुकीत मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याने त्यांना बाजार समिती निवडणूकीत सहभागी होता येणार आहे.
शिंदे सरकारच्या या निर्णयावर आपण समाधानी असुन कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदाधिकारी शेतकरी या नात्याने या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी सांगितले आहे.
