करमाळ्यात पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन; संजय आवटे, विलास बडे, मंगेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने,‘या’ प्रमुख मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करमाळा, माढा, कर्जत, जामखेड, परांडा व इंदापूर या तालुक्यातील पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन रविवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करमाळ्यातील हॉटेल राजयोग येथे करण्यात आले असून या कार्यशाळेचा ग्रामीण भागातील पत्रकारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करमाळा तालुका पत्रकार संघाने केले आहे.
या कार्यशाळेत लोकमतचे मुख्य संपादक संजय आवटे, आयबीएन लोकमतचे विलास बडे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, न्यूज 24 तास हिंदीचे विनोद जगदाळे, दै. लोकमत सातारा संपादक जगदीश कोष्टी, दै. सकाळचे जयंत जाधव, दै. पुण्यनगरी चे वेंकटेश पटवारी, रघुवीर मदने, दै. मानदेश नगरीचे सतीश सावंत, दै. सकाळचे पिंपरी चिंचवड वृत्त समूहाचे जयंत जाधव, ॲड. बाबुराव हिरडे आदी पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शामलताई बागल, माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्यासह करमाळा तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती गोवा येथील राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा दादा सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहरपंत चिवटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी ग्रामीण भागातील पत्रकारांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा. तसेच या ठिकाणी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर सुद्धा घेण्यात येणार असून याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा. असे आवाहन सचिव नासिर कबीर यांनी केले आहे.