भोगेवाडीच्या सरपंच राणी गायकवाड स्वतः चे मानधन गावातील मुलींसाठी देणारी पहिल्या सरपंच*
करमाळा प्रतिनिधी
भोगेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यचा अमृतमोहस्तव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी भोगेवाडीचे सरपंच सौ. राणी संतोष गायकवाड यांनी गावचे सुपुत्र शाहिद जवान किसन बापू काळे यांचे लोकवर्गणीतून स्मारक बांधण्याचीघो केली. सरपंच पदाचे शासनाचे ५ वर्षाचे येनारे मानधन गावातील प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचा पहिला हफ्ता भारणार आहे असे जाहीर केले. या वेळी विद्यार्थ्यांनाचे विविध कार्यक्रम व भाषण यांचे सर्वांनी कौतुक केले. ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक, पुरस्कार प्राप्त ग्रामस्थ, गुणवंत विद्यार्थी, कोरोना योद्धा यांचा सन्मान करून स्तुत्य उपक्रम घेतले. या वेळी उपसरपंच संतोष काळे, सरपंच प्रतिनिधी संतोष गायकवाड मा. उपसरपंच शशिकला गायकवाड, सदस्य रामलिंग पवार, शारदा ताई काळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
