Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

शेटफळ येथे बारा तोळे सोने सह सत्तर हजार रुपये चोरून चोरट्यांचे मोटारसायकलवर पलायन

शेटफळ प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच शेटफळ येथे एका रात्रीत चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न.एके ठिकाणी इमारतीच्या पोर्चला लावलेल्या ग्रीलच्या आधारे टेरेसवर जात उघड्या खोलीतून घरात प्रवेश करून चोरट्याने बारा तोळे सोने व रोख सत्तर हजार रूपयांची चोरी केली आहे. या चोरी नंतर चोरट्यांनी पोफळज रस्त्यानजिक असलेलें शरद पाटील यांच्या शेतातील घरापुढील मोटारसायकल चोरून चोरट्यांनी पलायन केले आहे.
येथील गावाच्या नजीक असलेल्या प्रतापसिंह लबडे यांच्या शेतातील घरात रात्री एक वाजता चोरट्याने पोर्चमध्ये लावलेल्या ग्रीलचा आधार घेत टेरेसवरून घरात प्रवेश केला.घरातील कपाटातील तेरा तोळे सोन्याचे दागिने पैसे व कपड्यांच्या खिशातील पैसे याची चोरी केली चोरी करत असताना घरातील व्यक्ती जागे झाल्याचा संशय येताच घराच्या मुख्य दरवाज्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यानंतर सुभाष गडगुले यांच्या शेतातील घराकडे त्यांनी मोर्चा वळवला तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही यानंतर ज्ञानदेव पोळ यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला तिथेही लोक जागे झाल्याने महादेव गुंड यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला तिथे त्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली नंतर शेजारी येथील शरद पाटील यांच्या शेतातील घरासमोर लावलेली बजाज प्लॅटीना कंपनीची मोटार सायकल घेऊन चोरांनी पलायन केले आहे. एकाच रात्रीमध्ये चार पाच ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला घटनेची खबर मिळताच रात्रीच करमाळा येथील ठाण्यातील सा. पोलिस निरिक्षक विनायक माहूरकर व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली गावातील दुकानाबाहेर लावलेल्या सी..सी.टीव्ही फुटेज चेक करून चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला.
करमाळा तालुक्यातील केडगाव, उमरड ,राजूरी येथील चोरीच्या घटना ताज्या असतानाच शेटफळ येथील चोरीमुळे शेतातील घरामध्ये राहाणार्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तपास लावून अशा प्रकारच्या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी चिखलठाण परिसरातील लोकांमधून केली जात आहे

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group