करमाळा शिक्षक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, अतुल पाटील, राहुल सावंत, चिंतामणी जगताप, देवानंद बागल, बिभीषण आवटे, महादेव फंड यांच्यासह शिक्षक समिती व पेन्शन संघटनेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
सदर पतसंस्थेचे ६३५ प्राथमिक शिक्षक सभासद असून कर्जमर्यादा १५ लाख रुपये व व्याजदर ८.४०% आहे. तसेच मुदत ठेवीसाठी ८% व्याजदर दिला जातो. मोबाईल ॲप सुरू करणारी ही जिल्ह्यातील पहिली पतसंस्था आहे.तसेच ५ लाख रुपयांची मयत निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विद्यमान चेअरमन अरुण चौगुले यांनी केले. यावेळी प्रताप काळे, आदिनाथ देवकते, तात्यासाहेब जाधव, साईनाथ देवकर, अजित कणसे, सतीश चिंदे, वैशाली महाजन, पूनम जाधव, हनुमंत सरडे, निशांत खारगे, भारत भानवसे, लालासाहेब शेरे आदी संचालकांसह सहसचिव रमेश नामदे, बाळासाहेब दुधे, वसंत बदर, दीपक जाधव व पतसंस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
कुंडलिक केकान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर साईनाथ देवकर यांनी आभार मानले.


