Sunday, September 20, 2026
Latest:
Uncategorized

एमबीबीएस परीक्षेत अनुष्का चिवटे प्रथम श्रेणीने उत्तीर्ण; विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा प्रतिनिधी : भारती विद्यापीठ सांगली प्रचलित भारती मेडिकल कॉलेजमधून अनुष्का महेश चिवटे यांनी एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्यासह शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनुष्का चिवटे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समर्थक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुतणी आहेत. कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
या यशाबद्दल विविध मान्यवर व संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारती विद्यापीठाचे संचालक आमदार विश्वजीत कदम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख  मंगेश  चिवटे नगराध्यक्ष सौ मोहिनी सावंत, कमलादेवी ट्रस्टचे अध्यक्ष  सोमनाथ आप्पा चिवटे, गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज, लिटिल चॅम्प इंटरनॅशनल स्कूल बेंगलोर शाखा करमाळा, स्वर्गीय मनोहर पंत चिवटे ब्लड बँक व डायलिसिस सेंटर तसेच करमाळा तालुका पत्रकार संघ आदी संस्थांनी अनुष्का चिवटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनीही अनुष्का चिवटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्का चिवटे यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून कौतुक अभिनंदन होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!