Sunday, February 15, 2026
Latest:
Uncategorized

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत प्रदेश महासचिव पदी विकास भोसले यांची निवड

*
कोल्हापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे पार पडलेल्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीस राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला (जि. सोलापूर) येथील सतीश भाऊ सावंत, तर प्रदेश महासचिवपदी कराड येथील विकास भोसले यांची निवड करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगरचे इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील, राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत, साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील, तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
बैठकीस प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका
निवडीनंतर बोलताना नूतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले की, संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटना ठोस भूमिका घेणार आहे. पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्या, मानधन व टोल माफीचा प्रश्न  तसेच विविध शासकीय सवलती यांसंदर्भातील मुद्द्यांवर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व गावपातळीवर संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!