निंभोरे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; स्वच्छता अभियान राबवून अनोखी आदरांजली
निंभोरे (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निंभोरे ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत स्वच्छता अभियान राबवून बाबासाहेबांना अनोखी आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरुवात कु. नंदिनी नितीन गायकवाड या चिमुकलीच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व पुष्पांजली वाहून करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
यानंतर ग्रामस्थ व तरुण वर्गाने एकत्र येत गावात स्वच्छता मोहीम राबवली. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हा संदेश दिला.
यावेळी सरपंच रविदादा वळेकर यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आयुष्यातील असामान्य योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी बाबासाहेबांचे विचार समाजात रुजविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास ऍडव्होकेट लुणावत, सरपंच रविदादा वळेकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील केरबा पन्हाळकर, दाजी मारकड, नितीन गायकवाड, रवी राऊत, ज्ञानेश्वर वाघमारे, आर. व्ही. ग्रुपचे अध्यक्ष ईश्वर मस्के, दत्ताभाऊ वळेकर, प्रविण वळेकर, समाधान वळेकर, अण्णा सावंत, विलास वळेकर, लक्ष्मण वळेकर, सोमा गुरव, शरद मारकड, राहुल मारकड, बाबुराव भंडारे, कदम महाराज, भैरू महाराज वळेकर, सचिन कांबळे, दादा कळसाईत, गणेश कळसाईत, सुशांत वळेकर, अभिजित वळेकर, विशाल खाडे, बळीराम काळदाते, कृष्णा गुरव, भगवान गायकवाड, जलाल पठाण तसेच कर्मचारी दिलीप मुळे, सुरेश गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


