मुस्लिम विकास परिषदच्या वतीने कोरोना योद्धा चा सन्मान
करमाळा प्रतिनिधी
मुस्लिम विकास परिषद च्या वतीने हजरत महंमद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून आज कै.नामदेवराव जगताप उर्दू प्राथमिक शाळेत कोवीड काळात ज्यांनी काम केले अशा कोरोना योद्धा जब्बार खान मौलाना मोहसीन शेख.मयुर युसूफ बागवान यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम विकास परिषदचे अध्यक्ष हाजी फारूक बेग. बहुजन विकास संस्था करमाळा चे अध्यक्ष इसाक पठाण करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार. आलीम खान समीर शेख वाजीद शेख जमीर मुलाणी. ओ.बी.सी सेल चे अध्यक्ष चंद्रकात मुसळे विनोद महानवर आदी जणांच्या उपस्थित झाला तर यावेळी लहान मुलांना बुंदीचे लाडू वाटण्यात आले यावेळी मौलाना मोहसीन शेख जब्बार खान यांनी आपले अनुभव सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सावंत म्हणाले की मुस्लिम विकास परिषदेने आज ज्यांनी कोवीड काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे अशा कोरोना योद्धा चा सन्मान हजरत महंमद पैगंबर जयंती चे औचित्य साधून करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो तसेच दीड वर्षानी शाळा सुरू होत आहे मुलांना मिठाई वाटुन त्यांचे स्वागत करण्यात आले मुस्लिम विकास परिषद वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते यातुन समाजाला एक चांगला संदेश या कार्यक्रमातून जातो असे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमा साठी हाजी युसूफ शेख. हारूण वस्ताद.अकबर बेग आयान बेग मुबारक फकीर रज्जाक बेग साजीद बेग आदी जण उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक इसाक पठाण यांनी केले तर आभार मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांनी मानले.
