Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorized

विषारी सर्पाला सर्पमित्र प्रशांत भोसले यांनी दिले जीवदान, तर नागरिकांना ही केले महत्वाचे आवाहन…

करमाळा-प्रतिनिधी
करमाळा येथील एम. आय. डी. सी. जवळील एकलव्य प्राथमिक आश्रम शाळेच्या परिसरामध्ये एक विषारी सर्प आढळून आला होता. या सर्पाला पाहताच परिसरातील सर्वच नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. व काही नागरिकांनी तर त्या सर्पाला मारण्यासाठी पुढाकार सुध्दा घेतला होता. परंतु निसर्गप्रेमी आकाश वाघमारे यांनी त्या सर्पाला मारू नका, त्याला जीवदान दिले पाहिजे. तोही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करतो. व तो या ठिकाणी कोणत्याही नागरिकाला इजा पोहोचविणार नाही, याची मी हमी घेतो. अशा प्रकारचा विश्वास त्यांनी संबंधित नागरिकांना दिला. व त्या वेळेत सर्पमित्र व संघर्ष न्यूज सोलापूरचे प्रतिनिधी प्रशांत भोसले यांच्याशी संपर्क साधला. व सदरील सर्पाविषयी त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर भोसले हे सदर ठिकाणी पाच ते दहा मिनिटात उपस्थित झाले. तोपर्यंत त्या सर्पाला कोणाकडून ही जा होणार नाही. व तो इतरत्र कुठेही जाणार नाही. यासाठी निसर्गप्रेमी आकाश वाघमारे यांनी मोठा पुढाकार घेतला होता. ज्यावेळेस सर्पमित्र प्रशांत भोसले सदरील ठिकाणी आले. त्यावेळेस त्यांनी त्या सापाची माहिती दिली. व सांगितले की, हा एक विषारी साप आहे. याचे नाव स्पॕक्टीकल कोब्रा असे आहे. व या सर्पाला कोणत्याही प्रकारची, नागरिकांकडून इजा न होऊ दिल्याबद्दल निसर्गप्रेमी आकाश वाघमारे यांचे आभार देखील मानले. व सदरील सर्पाला भोसले यांनी योग्यप्रकारे हाताळत त्याला एका भरणीमध्ये घेतले. व मानव वस्तीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यामध्ये सर्पाला सोडण्यात आले. यावेळेस सर्पमित्र प्रशांत भोसले यांनी सर्पाला पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फी घेतली नाही. व स्थानिक नागरिकांचे हि काही प्रमाणात प्रबोधन केले. त्याचप्रमाणे जर आसपास कोठेही सर्प आढळला तर, त्वरित सर्प मित्रांशी संपर्क साधावा. अशाप्रकारचे हि आवाहन या वेळेस सर्पमित्र प्रशांत भोसले यांनी केले. तर स्थानिकच्या नागरिकांनीही भोसले व वाघमारे यांचे भरभरून कौतुक केले. तरी सदरील सर्पाला जीवदान देण्याकामी सर्पमित्र प्रशांत भोसले, निसर्गप्रेमी आकाश वाघमारे तर या सर्पाला पकडण्यासाठी वरिष्ठ सर्पमित्र राहुल घाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळेस संबंधितांना लाभले होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group