Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे आरोग्यसेविका कायमस्वरूपी नेमणूक करण्याची करमाळा तालुका शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेटफळ .येथे आरोग्य उपकेंद्र असून देखील आरोग्य सेवा मिळत नाही कारण येथे आरोग्य सेविका कायमस्वरूपी नाही तरी तात्काळ कायमस्वरूपी .आरोग्य सेविकेची नेमणूक करावी असे निवेदन‌ करमाळा तालुका शिवसेनेचे वतीने जेऊर तालुका आरोग्य उपकेंद्र  अधिकारी यांना देण्यात आले आहे .                      सदर निवेदनात असे म्हटले आहे की शेटफळ या गावात आरोग्य उपकेंद्र असूनही कायमस्वरूपी आरोग्य सेविका गेल्या वर्षापासून कायमस्वरूपी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची आरोग्य सेवेची मोठी हेळसांड होत आहे तरी कायमस्वरूपी आरोग्य सेविकेची नेमणूक करून येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेचे वतीने निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी राहुल कानगुडे तालुका प्रमुख, दादासाहेब थोरात उप तालुकाप्रमुख शिवसेना नवनाथ गुंड युवासेना तालुका प्रमुख , दादासाहेब तनपुरे ‌शिवसेना तालुका उपप्रमुख    महादेव सुरवसे युवासेना शहर प्रमुख जेऊर विशाल पाटील शिवसेना नानासाहेब पोळ, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group