पंचायत समिती महिला व बालकल्याण विभाग करमाळा यांच्याकडून जिल्हा परिषद सेस अंतर्गत सर्वसाधारण वैयक्तीक योजनाकरीता अर्ज करण्याचे आवाहन-मनोज राऊत
करमाळा प्रतिनिधी पंचायत समिती करमाळा महिला व बालकल्याण विभाग सन २०२४-२५ जिल्हा परिषद सेस अंतर्गत वैयक्तीक योजना करीता लाभार्थी यांचेकडुन वैयक्तीक योजनांचे अर्ज स्विकारणेबाबत.. (सर्वसाधारण) आवाहन पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.
सदर योजनांचे प्रस्ताव अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.तरी सदर योजनांची पंचायत समिती स्तरावरुन प्रचार व प्रसिद्धी देण्यात येत आहे. यादवारे करमाळा विकास गटाकडील सर्व ग्रामपंचायतींना योजना विषयक माहिती देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींना योग्य व पात्र लाभार्थी यांचे जास्तीत जास्त अर्ज येतील याबाबत सर्व ग्रामसेवक यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा परिषद सेस मधील योजना
१. ग्रामीण भागातील ७ वी ते १२ पास महिला व मुलींना MSCIT संगणक प्रशिक्षण देणे. २. महिला व मुलींना तांत्रिक, व्यावसायिक व कौशल्य वृदधी प्रशिक्षण देणे अंतर्गत ग्रामीण भागातील १० वी पास महिला व मुलींना टॅली संगणक प्रशिक्षण देणे. ३. ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी / मिरची कांडप यंत्र पुरविणे.
४. ग्रामीण भागातील महिलांना पिकोफॉल मशिन पुरविणे.
५.इ.५ वी ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुलींना सायकल वाटप करणे.सदर महिला व बालकल्याण (DBT) विभागाशी निगडीत योजना बाबत श्री. गोरख एम. खंडागळे (कनिष्ठ सहाय्यक) मो.नं. ९६२३२५३०२२ समाजकल्याण / मबाक विभाग, पंचायत समिती करमाळा यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन मा. श्री. मनोज राऊत गटविकास अधिकारी (वर्ग-१). पंचायत समिती करमाळा यांचेकडुन करण्यात आले आहे. तरी या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
