मराठा व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी शैक्षणिक विकासासाठी शासनाने आरक्षणासंदर्भात अटी शिथिल करून न्याय देण्याची प्राध्यापक रामदास झोळ यांची मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागणी
*करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले असून शासनाने मराठा व ओबीसी सवलती शिथील कराव्यात अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवली सराटी येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन वाढदिवसानिम्मित सत्कार करून दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की मराठा ओबीसी समाजाला जातपडताळणी शैक्षणिक अडचणी येत आहेत वस्तीगृह भत्ता याबाबत शासनाने अटी शिथिल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .याबाबत आपण आवाज उठवल्यानंतर सकारात्मक निर्णय होईल.याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर येथे सात ऑगस्टला होणाऱ्या शांतता रॅली संदर्भात चर्चा करण्यात आली .यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे ,निलेश शिंदे ,सुहास काळे पाटील, भीमराव ननवरे हे उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक रामदास झोळ यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी नोकरी, शिक्षण व आरक्षण यामध्ये सध्या उद्भवत असलेल्या अडचणी या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये,*
1. सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणी बाबत काढलेल्या शासन निर्णयामध्ये फक्त SEBC च्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ती मुदतवाढ सरसकट सर्व मागासवर्गीय जातींना देण्यात यावी.
2. बहुजन समाज कल्याण विभागाने 14 जून 2024 रोजी काढलेला 1554 अभ्यासक्रमा बाबतचा शासन निर्णय SEBC,EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना लागू करावा.
3. केंद्र सरकारचे EWS आरक्षण SEBC च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागू करावे.
4. OBC च्या विद्यार्थ्यांना वस्तीग्रह भत्ता डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीग्रह भत्याप्रमाणे सरसकट लागू करावा.
इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.असुन याबाबत शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षणासंदर्भात अटी शिथिल करून या समाजाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला असल्याचे सांगितले.
