करमाळा शहरात आज सहा रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 31

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात 19 जुलै रोजी एकूण 19 जणांची तपासणी ॲन्टीजीन रॅपीड टेस्टींग कीट द्वारे करण्यात आली. त्यापैकी एकूण 06 कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले.त्यामध्ये 3 पुरुष व 3 स्त्री असून सर्वजण करमाळा शहरातील आहेत.
त्यामुळे करमाळा शहरातील कॉविड 19 बाधित ची संख्या एकूण 31 (सरकारी दवाखाना व खाजगी तपासणी दोन्ही मिळून)इतकी झाली आहे. तसेच वरील पॉझिटिव्ह आलेले सर्व व्यक्ती ह्या. qurantine केलेले व high रिस्क contacts आहेत.

अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की परगावी व परजिल्हा येथील लग्न समारंभ , सोहळे गर्दी करून जाणे टाळावे. रॅपिड अँटिजेन test ची तालुक्यासाठी अजून मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ धुवा.असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
