Wednesday, April 16, 2025
Latest:
Uncategorizedसकारात्मक

उजनी धरण मायनसमधुन प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

करमाळा प्रतिनिधी. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा वाटचाल प्लस कडे सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . 16 जूनला धरणाची पाणीपातळी वजा 23 टक्याच्या पुढे गेली होती पण चांगली सुरुवात केलेल्या पावसाने धरण प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी धरणावर सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून आहेत धरण केव्हा शंभर टक्के भरते याकडे या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्याचे लक्ष लागलेले असते धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाण्यात वाढ होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे अद्यापही भरली नसल्याने त्यामुळे या धरणातील पाणी उजनीमध्ये येण्यास अद्यापही वेळ लागणार आहे. पाणीपातळी मायनस म्हणुन प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा वेग कमी झाला असला तरी उजनी धरण प्लसमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group