शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन दिवसाचा कीर्तन सोहळा
करमाळा प्रतिनिधी
शिवसेना जवळ सोलापूर जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य महेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा शहरात दोन दिवसाच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कीर्तन सोहळ्याच्या श्रवणाचा लाभ घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
6 मार्च रोजी बुधवारी सायंकाळी सात ते दहा या वेळेत झी टॉकीज वर प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार योगिताताई डोंबाळे यांचे कीर्तन होणार आहे.सात मार्च गुरुवारी सायंकाळी सात ते दहा या वेळेत झी टीव्हीवर सातत्याने कार्यक्रम सादर करणारे ह भ प विनोद महाराज रोकडे कोळगावकर यांचे कीर्तन होणार आहे हे कीर्तन सोहळा करमाळा देवीचा माळ रोडवर अमरनाथ टावर येथे होणार आहे तरी या कीर्तनासाठी भक्त मंडळींनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
