हर हर महादेवाच्या जयघोषात करमाळा शहरातुन खोलेश्वर महादेव रथाची निघाली भव्य मिरवणुक
करमाळा प्रतिनिधी खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने किल्ला वेस येथील श्री खोलेश्वर महादेव रथाची मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य काढण्यात आली. खोलेश्वर महादेवाचा संपूर्ण रथ सागवानी आहे त्यावर कोरीव काम केलेले आहे. हर हर महादेवाच्या जयघोषात खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली मंदिराच्या वतीने श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी रथ यात्रा उत्सव साजरा करण्याची पुरातन पद्धत आहे.
खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने आयोजित या रथ यात्रेमध्ये अतिशय अवजड व भव्य दिव्य लाकडी रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढला जातो.
रथ ओढण्याचा मान परंपरेने येथील वडार समाजाकडे चालत आलेल आहे. तर रथात बसण्याचा मान सुतार समाजाकडे आहे. देवापाशीचा बसण्याचा मान नागेश गुरव या पुजाऱ्यांचा आहे. रथ आपल्या दारासमोर गेल्याशिवाय सोमवार उपवास न सोडण्याची प्रथा आज देखील पळण्यात येते या रथाच्या दर्शनभागी खोलेश्वराची प्रतिमा आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते रथाची पुजा करण्यात आली .मिरवणूक समाप्ती नंतर खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सर्व मानकऱ्यांचा सत्कार युवा नेते शंभुराजे जगताप यांनी केला मंदिराची सजावट महेश मोरे यांनी केली आहे. या मिरवणुकीसाठी खोलेश्वर आरती मंडळांच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
