करमाळा शहर व तालुक्यात २६ सप्टेंबर रोजी १९ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात २६ सप्टेंबर रोजी एकूण २१३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ९ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात ६० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह यामध्ये भिमनगर – २ पुरुष, १ महिला, गणेशनगर – २ महिला, मेनरोड – १ पुरुष तर ग्रामीण भागात १५३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये श्रीदेवीचामाळ – १ पुरुष, वीट – १ पुरुष, लिंबेवाडी – १ महिला, जातेगाव – ४ पुरूष, ६ महिला यांचा समावेश आहे .आज ७० जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १४२४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ३९५ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १८४४ वर जाऊन पोहोचली आहे.
