कुणबी दाखला काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सेतू कार्यालयाकडून लूट संभाजी ब्रिगेडचे गणेश कुकडे यांची कारवाई करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी कुणबी दाखला काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सेतू कार्यालयाकडून लूट होत आहे. ही लुट तात्काळ थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की ज्या नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ते नागरिक किंवा जे लोकं आहेत ते सेतू कार्यालयाकडून अर्ज करत असतात तेव्हा सेतू कार्यालयाकडून जेव्हा दाखला ऑनलाईन करण्यासाठी एका दाखल्यासाठी 500 रूपये घेतले जातात अशा प्रकारे नागरिकांची लूट होत आहे यांच्याकडे अधिकार्यांचे भी दुर्लक्ष आहे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी दिला आहे.
