कै.बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानमार्फत वनविभागातील मुक्या प्राण्यांना पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय
करमाळा प्रतिनिधी मूक्या प्राण्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असुन भर उन्हाळ्यात मुक्या जनावरांचे हाल होऊ नये म्हणून करमाळा शहरातील कै बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानमार्फत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शहरालगत असलेल्या वनविभागातील मुक्या प्राण्यांना व पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रतिष्ठानमार्फत सचिन गायकवाड त्यांचे सहकारी स्व खर्चाने टँकरने दरवर्षी पाणी देत आहेत.हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत आहे.कै बाबुराव तात्या गायकवाड करमाळा शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यापैकी एक हा उपक्रम आहे.दरवर्षी उन्हाळ्यात मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे मोठया प्रमाणात हाल होतात ही जाणीव ठेवून ऐन उन्हाळ्यात प्राण्याचै हाल होऊ नये म्हणून वनविभागातील जमिनीवर पाणवठे तयार करून पाण्याचे टॅकरनै 27 हजार लिटर पाण्याने पाणवठे भरून पाण्याची सोय केली आहे. सामाजिक सेवा करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने काम करतात.यावेळी महादेव फंड, गणेश कुकडे सर, पत्रकार नासीर कबीर, दिनेश मडके, सचिन जव्हेरी समाधान फरतडे, उद्योजक निलेश बिडवे,प्रमोद भाग्यवंत,सुरज इंदुरे पै.दादा इंदलकर आदी मान्यवर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान मार्फत नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. माणुसकीची भिंत, रूग्णांना मदत, पशुपक्षांना पाणी व खाद्य, उत्सवामध्ये गरीब लोकांना शिधावाटप, शैक्षणिक साहित्य वाटप अशाप्रकारे सातत्याने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या या प्रतिष्ठानचा आदर्श इतरांसाठी अनुकरणीय ठरलेला आहे. आजच्या या जगामध्ये प्रत्येक जण पैसा प्रतिष्ठा पद यांच्या मागे लागला आहे. अशा परिस्थितीत माणुसकी दयाभाव नावाला राहिला असुन मुक्या प्राण्यांवर प्रेम करून त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पाण्याची सोय करुन मानवतेची शिकवण देणाऱ्या कै बाबुराव तात्या गायकवाड यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
