कोरोनाकाळात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल करमाळयाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना बुधभूषण फाऊंडेशनच्यावतीने सन्मानपत्र.

करमाळा प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीच्या या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन काम करत असलेल्या व सध्याच्या परिस्थितीत जनतेची अखंडपणे सेवा करणारे विशेषतः पोलीस, डॉक्टर, पालिकेचे कर्मचारी अशा अनेकांनी जीव धोक्यात घालून आपली सेवा देण्याचे काम केले आहे. करमाळा शहरातही गेल्या मार्च महिन्यापासून येथील पोलीस अविरत सेवा देत असुन यामध्ये करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी कोरोनाच्या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी विशेष काळजी घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा केली आहे. यासाठी बुधभूषण फांउडेशन पूणे येथील संस्थेच्या वतीने कोरोना काळात उत्तमपणे सेवा केल्याबद्दल पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचा सन्मान पञ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गेश राठोड, अजित यादव, सुशील राठोड, अमोल यादव व नवी मुंबई येथील ॲड.संतोष बागडे उपस्थित होते.
