कर्मवीरआण्णासाहेब जगताप विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बुधभूषण सामाजिक फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण.
करमाळा प्रतिनिधी बुधभूषण फौंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.हे वृक्षारोपण विद्यालयाची चालक संस्था समाजसेवा मित्र मंडळाचे सचिव श्री.गुलाबराव बागल व मुख्याध्यापक श्री.गोविंदराव सारोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्रणांगणात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.
स्वातंत्र दिवसानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक सारोळकर व संस्था सचिव गुलाबराव बागल यांनी ध्वजारोहण केले.सध्या करमळ्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोजक्याच पदाधिकाऱ्यांना बोलवून सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
याप्रसंगी बुधभूषण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दुर्गेश राठोड ,अमोल यादव उपमुख्याध्यापक आर.व्ही.जगताप इ.उपस्थित होते.