पदोन्नतीतील आरक्षणाच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन.

करमाळा प्रतिनिधी – पदोन्नतील आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष हनुमंत विटकर आणि कार्याध्यक्ष प्रमोदबकांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.भारत मुक्ती मोर्चा मार्फत संपुर्ण देशभर राष्ट्रपतींना निवेदने देण्यात येत आहेत.
राज्यघटनेतील कलम_१६(४) हे मूलभूत अधिकाराचे कलम आहे त्यामुळे त्यात बदल करता येत नाही असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बामसेफ राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब बळी,तालुकाध्यक्ष दयानंद चौधरी,सचिन अब्दुले सर,किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष मधुकर मिसाळ पाटील मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष किसन बबन कांबळे,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे तालुकाध्यक्ष निरंजन चव्हाण,डेबुजी युथ ब्रिगेड तालुकाध्यक्ष राहुल शिंदे,विद्यार्थी मोर्चाचे सिद्धार्थ वाघमारे,दिपक कांबळे,राहुल आहेर,युवराज आवाड,बौध्द महासभेचे सावताहरी कांबळे,विक्रम राऊत सर,दिपक जाधव सर,बाळू दुधे सर,रमेश नामदे सर,राजू वाघमारे सर,जितेश कांबळे सर,निशिकांत कांबळे सर,अजिम शेख,बबलू कांबळे,अलीम खान,निलेश कांबळे, प्रशांत भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.
