किंडरजॉय प्री -प्रायमरी CSC बालविद्यालय करमाळा यांचे वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.
करमाळा प्रतिनिधी
किंडरजॉय प्री -प्रायमरी CSC बालविद्यालय हे करमाळा तालुक्यातील हे एकमेव प्री–प्रायमरी स्कुल आहे कि जे CSC ACADEMY शी संलग्न असून मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि यांचे मान्यताप्राप्त प्री–प्रायमरी स्कुल आहे. प्री–प्रायमरी स्कुल मध्ये पारंपरिक शिक्षणा बरोबरच टेकनॉलॉजि आधारित शिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे. “अनुभवातून शिक्षण” असे प्री–प्रायमरी स्कुल चे ब्रीद वाक्य आहे. प्री–प्रायमरी स्कुल मध्ये प्रायोगिक शिक्षणावर अधिक भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांना सहज शिकता येते व शिकताना आनंद वाटतो.
प्री–प्रायमरी स्कुल चे वार्षिक स्नेह संमेलन शुक्रवार दिनांक १७/०२/२०२३ रोजी महादेव मंदिर, किल्ला वेस येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण क्षेत्रातील महामेरू प्रा. श्री. गणेश भाऊ करे-पाटील (अध्यक्ष-यशकल्याणी सेवाभावी संस्था) होते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्री–प्रायमरी स्कुल करिता LCD TV सेट सप्रेम भेट देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद चांदगुडे, (उदयॊजक), श्री. सूर्यवंशी सर (सहसचिव विद्या विकास मंडळ), श्री. दीपक ओहोळ (मॅनेजर करमाळा अर्बन बँक), श्री.दिनेश मडके (पत्रकार), श्री. धनराज कांबळे (संस्थापक-अध्यक्ष किंडरजॉय प्री -प्रायमरी स्कुल), सौ. अंजली श्रीवास्तव (लेखिका व समाजसेविका), सौ. नलिनी जाधव (NCP करमाळा तालुका अध्यक्ष), श्री. प्रफुल्ल शिंदे व श्री. विशाल शिंपी CSC coordinator करमाळा तालुका हे होते. वार्षिक स्नेह संमेलनामध्ये बाळ गोपाळांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्व कार्यक्रम बाळ गोपाळांनी अतिशय आत्मविश्वासाने सादर केले. कार्यक्रमाला पालकवर्ग प्रचंड संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमासाठी प्री–प्रायमरी स्कुल च्या संचालिका सौ. राजश्री कांबळे, सौ. मीनाक्षी ढाळे, सौ. सुप्रिया जोगदंड, श्रीमती. पूजा माने ,सौ.. वंदना काळे मावशी, सर्व स्टाफ यांचे परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला तसेच सौ. मनीषा शिंदे (डान्स कोरिओग्राफर) यांचे सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
