देवळाली येथे माझी वसुंधरा व महिला दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी देवळाली येथे माझी वसुंधरा व महिला दिन साजरा ग्रामपंचायत देवळाली येथे महिला दिन व माझी वसुंधरा अंतर्गत श्री मनोज कुमार मैत्री साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती करमाळा यांचे माझे वसुंधरा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सौ सुनिता धनंजय शिंदे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर युवा सरपंच श्री आशिष भैय्या कल्याणराव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बोराडे पंचायत समिती करमाळा माझी वसुंधरा प्रमुख भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत देवळालि शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी वसुंधरा मध्ये आपण वायू प्रदूषण कमी केले पाहिजे जमिनीची धूप थांबवली पाहिजे प्रत्येकाने किमान दोन झाडे लावावीत तसेच प्रत्येकाने आदराने वागवावे यावेळी पर्यावरण दूत म्हणून नेमणूक करण्यात आले तसेच उपस्थित महिला मधून मनोगत व्यक्त करण्यात आला तसेच कविताही मानण्यात आल्या आभार प्रदर्शन श्री बाळासाहेब गोरे गुरुजी यांनी व्यक्त केले
