Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीराजकीय

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युवासेना तालुका समन्वयकपदी कुमार माने यांची निवड

करमाळा प्रतिनिधी : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युवासेना तालुका समन्वयकपदी कुमार माने यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र त्यांना सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सोलापुर युवा सेना जिल्हा विस्तारक उत्तम अहिवळे, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, पंढरपूर युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.माने यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद देण्यात आले आहे. करमाळा नगरपालिकेच्या नगरसेविका राजश्री माने यांचे ते चिरंजीव आहेत. माने हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार करमाळा तालुक्यामधे तळागाळापर्यंत पोहचवले जातील, असे माने यांनी सांगितले आहे. युवा सेना जिल्हाउपप्रमुख मयुर यादव, करमाळा शहर समन्वयक प्रसाद निबांळकर, किशोर पवार  नितीन परदेशी यावेळी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group