Thursday, April 17, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळाशैक्षणिक

करमाळ्यातील स्नेहालय स्कूलने काढली चिमुकल्यांची दिंडी; दिंडीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

करमाळा प्रतिनिधी
जय, जय, राम कृष्ण हरी..! ज्ञानोबा माऊली, माऊली, तुकाराम..! असा अंखड जय घोष अन् टाळ-मृदंगाचा गजर करीत स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमधील छोट्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे दिंडी काढली.
यावेळी हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक झाडे लावा-झाडे जगवा, मुली वाचवा-देश वाचवा, सुंदर स्वच्छ शहर, पाणी वाचवा जलसंवर्धन करा असे संदेश देणारे फलक हातात घेऊन पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले.विदयार्थ्यांनी ‘नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे!फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे !! कमरे वरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू! असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला होता. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूक्मिणी, मुक्ताई, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळयात माळा विविध संतांची वेशभूषा करून दिंडी करमाळा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली.
हा सोहळा साजरा करण्यासाठी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी, संस्था संचालिका नेहा दळवी, सहशिक्षिका सीमा कोरडे, शिवांगी शिंदे, हेमा शिंदे, राधा बगडे, पल्लवी माळवे, फरहान खान, कोमल बत्तीशे, अंजुम कांबळे, सविता पवार, मन्सूर तांबोळी, अंकुश नाळे आदी कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले होते. यावेळी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group