आषाढी एकादशीला कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी दयावी हाजी उस्मानशेठ तांबोळी अध्यक्ष मुस्लिम समाज यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी एकादशीच्या दिवशी मुस्लिम समाजाची बकरी ईद येत असल्यामुळे मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरला पांडुरंगाची आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा असते आणि ह्या वारीला वारकरी महाराष्ट्रातुन पंधरा ते वीस दिवसांपासून पायी चालत आप आपल्या दिंडीत मोठया भक्तिभावाने पंढरपूर ला विठ्रठलाच्या दर्शनासाठी जातात आणि समाजाची बांधिलकी म्हणून सर्वधर्म समभावाची भावना ठेवून सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी व उभ्या महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण करावा असे हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
