शिवजयंतीनिमित्त उत्सवसमितीच्यावतीने शाहीर सुरेश जाधव यांचा पोथरे येथे आज सायंकाळी पोवाड्याचा कार्यक्रम
पोथरे प्रतिनिधी करमाळा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज गुरूवार (ता23) रोजी सायंकाळी साडे सात वाजता पोथरे तालुका करमाळा येथे संभाजीनगर येथील शिव शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पोथरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होणार आहे.
